१९३० ची जागतिक महामंदी ही 20व्या शतकातील व अमेरिकेतील सर्वात मोठी आर्थिक संकटाची घटना होती. त्यात काही लोकांच्या लालसेपोटी अनेक पिढ्या बरबाद झाल्या, अनेकांनी आत्महत्या केली, अनेक बँका रसातळाला गेल्या, संपूर्ण जगाच्या शेअर मार्केट मध्ये अफरताफरी पसरली आणि संपूर्ण शेअर मार्केट कोसळले. यामुळे अनेक लोक रस्त्यावर आले, स्वतःच्या परिवाराला सांभाळण्या इतपत सुद्धा लोकांची लायकी राहिली नव्हती. जगाच्या इतिहासातील सर्वात भयानक बेरोजगारी यावेळेस पाहायला मिळाली होती.

जागतिक महामंदी कशामुळे झाली?

थोडक्यात सांगायचं झालं तर आर्थिक महामंदी मुख्यतः शेअर मार्केट कोसळल्याने आणि बँकाच्या अपयशामुळे झाली होती. लोकांनी अचानकपणे सर्वच्या सर्व शेअर्स विकुन टाकले, बँकेतून सर्व पैसा काढून घेतला, त्यामुळे शेअर मार्केट कोसळले आणि हे आर्थिक संकट आपल्याला पाहायला मिळाले.

शेअर मार्केट म्हणजे काय? ते आपण थोडक्यात समजावून घेऊ.

समजा एक कंपनी आहे आणि त्या कंपनीची मूल्य 10 बिलियन आहे. परंतु कोणत्याही एका व्यक्तीकडे एवढे पैसे असणे शक्य नाही. त्यामुळे कंपन्या तो पैसा आपल्या कंपनीचे शेअर्स किंवा हिस्सा विकून जमा करतात, जमा केलेल्या पैश्यामुळे त्या कंपनीची अधिक वाढ होण्यास मदत होते आणि अश्या प्रकारे शेअर्स विकत घेऊन साधारण व्यक्ती सुद्धा त्या कंपनीच्या होणाऱ्या वाढीचा हिस्सा बनू शकतो, आणि ज्या प्रकारे कंपनीची वाढ होत जाते त्याच प्रकारे त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत सुद्धा वाढत जाते,

उदा. इ.२०२० मध्ये MRF टायर्स या कंपनिच्या एका शेअर्सची किंमत हि रु.२७१० होती आणि आज (12/12/2021) त्या एका शेअरची किंमत रु.७४,२५० आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर योग्य प्रकारच्या कंपनीत गुंतवणूक करून त्या कंपनीच्या वाढी सोबत तुम्ही तुमचाही फायदा करून घेऊ शकता.

आता आपण पाहू, नेमकं 1929 मध्ये काय झालं?

लोकांनी अचानकपणे आपले सर्वच्या सर्व शेअर्स विकायला काढले. शेअर मार्केटची यंत्रणा कोसळणार आहे, अशी भिती लोकांमध्ये पसरली होती.
यंत्रणा कोसळणार म्हटल्यावर आपले पैसे बुडतील, या भीतीने सर्वांनी आपल्या जवळील शेअर्स विकुन टाकले.
सर्व शेअर्स विकल्यामुळे शेअर मार्केटमधला पैसा कमी झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाची लिक्विडीटी व्यवस्थित राहिली नाही.

लिक्विडीटी व्यवस्थित न राहिल्यामुळे मार्केट मधील पैशाच्या सर्क्युलेशन मध्ये बाधा तयार झाली.

सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे, चलनाची किंमत घसरली आणि आर्थिक पडझड निर्माण झाली. अर्थव्यवस्था पुर्णपणे मोडकळीस आली.

जागतिक महामंदी 1929 ची कारणे –

  1. खराब आर्थिक धोरण – पहिले महायुद्ध 1918 मध्ये संपल्यानंतर अमेरिकेने संपूर्ण देशातील लोकांसाठी ‘Buy Now, Pay Later’ ची स्कीम सुरु केली. त्यामुळे लोकांनी अचानकपणे खुप खरेदी करण्यास सुरुवात केली.
  2. लिबर्टी बॉंड – लिबर्टी बॉंड हे सरकारी बॉंड होते आणि लोक ते खरेदी करायचे. या बॉंडचा पैसा सरकार युद्धा मध्ये खर्च करायची. लोकांचा बॉंड खरेदी करण्याचा ओघ बघून प्रायव्हेट कंपन्यांनी सुद्धा मोठ्याप्रमाणात प्रायव्हेट बॉंड देऊ करण्यास सुरुवात केली. लोकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे हे बॉंड खरेदी केले.
  3. जास्तीचे उत्पादन – कंपन्यांनी खूप मोठ्याप्रमाणात ओव्हर प्रोडक्शन केले, वस्तू जास्त झाल्या आणि खरेदी कमी झाली होती.
  4. संपत्तीचे असमान वितरण – देशाच्या एकूण संपत्ती पैकी 50% पेक्षा जास्त संपत्ती फक्त 3 – 4% लोकांकडे होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे धागेदोरे या लोकांच्या हातात होते.
  5. आर्थिक धोरणाविषयी सरकारचे अलिप्ततेचे धोरण – कोणत्या कंपन्यांना शेअर देऊ करण्याचा अधिकार मिळत आहे, यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नव्हते. कोणतीही कंपनीला कितीही रूपयाचा शेअर देऊ करायची, यावर काहीच निर्बंध नव्हते. खाजगी कंपन्या कसे काम करत आहेत, देशातील शेअर मार्केट कशा प्रकारे काम करत आहे, ते कोणकोणते आर्थिक बदल करत आहेत, याबद्दल सरकारला व्यवस्थितपणे काहीच माहिती नव्हती.
  6. आयातीवरील अति उच्च कर (High Tariff)
  7. देशा अंतर्गत भ्रष्टाचार
  8. वॉल स्ट्रीट कशा प्रकारे काम करत याबद्दल जनतेला अजीबाद कशाचाही गंध नव्हता.
  9. राष्ट्रपती Hoover च्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे सुद्धा या घटनेला खतपाणी घातले.
  10. या सर्व गोष्टींमुळे लोकांचा यंत्रणेवरील विश्वास उडाला आणि फक्त एकाच आठवड्यात लोकांनी आपली सर्व इन्व्हेस्टमेंट, सर्व शेअर्स विकून टाकले.

परिणाम –

  • अमेरिकेतील सर्व लोकांनी बँकेतून पैसा काढण्यास सुरवात केली.
  • जेवढ्या काही लोकांची पगार सुरू होती त्यात मोठ्याप्रमाणात कपात झाली.
  • जगातील सगळ्यात जास्त बेरोजगारी अमेरिकेत पाहायला मिळाली. त्यावेळेस अमेरिकेत 25% पेक्षा जास्त बेरोजगारी होती.
  • अशा प्रकारच्या आर्थिक संकटाचा खूपच वाईट परिणाम शेतीवर होतो. त्यावेळेस शेतकऱ्यांचे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले होते.
  • अमेरिकेचा GNP कोसळला. औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे कोलमडून गेले होते.

पुढचे 10 वर्षे या आर्थिक महामंदीचा परिणाम अमेरिकेला अनुभवायला मिळाला. फक्त एकाच आठवड्यात अमेरिकेचा आर्थिक विकास जवळपास 20 वर्षे मागे आला.

याकाळात संपूर्ण जगाचा अमेरिकेवर खूप विश्वास होता. अमेरिकेला जगात मातब्बर देश म्हणून ओळखले जायचे. जे अमेरिका करायचा बाकी देश सुद्धा त्याचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असत. याचाच परिणाम म्हणून अमेरिकेची अशी वाईट अवस्था पाहून संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था सुद्धा कोलमडण्यास सुरुवात झाली. संपूर्ण जग आर्थिक महामंदीत होरपळून निघाले.

त्यानंतर 1933च्या निवडणुकीत राष्ट्रपती Hoover पराभूत झाले आणि त्यांच्या जागी डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपती Roosevelt निवडून आले. त्यांनी देशाला यातून बाहेर काढण्यासाठी New Deal Policy आणली. अमेरिकेला या आर्थिक मंदीतून पूर्णपणे बाहेर पडण्यास 1945 साल उजडावे लागले. दुसऱ्या महायुद्धच्या समाप्तीनंतरच या आर्थिक महामंदीची सुद्धा समाप्ती झाली, असे म्हणता येईल.